
इकरा शाहिन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान प्रदर्शनी”चे आयोजन
इकरा शाहिन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान प्रदर्शनी”चे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : इकरा शाहिन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जळगाव यांच्या वतीने “कुरआन आणि विज्ञान प्रदर्शनी”चे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत इकरा कॅम्पस, मेहरूण येथे भरविण्यात येणार आहे.
या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी कुरआनमधील आयातींशी संबंधित विज्ञानातील सत्यांचा सखोल अभ्यास करून त्यांचे सर्जनशील आणि शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण केले आहे. प्रदर्शनीत प्रत्यक्ष उदाहरणे, माहितीपूर्ण प्रात्यक्षिके तसेच विविध शैक्षणिक मॉडेल्सच्या माध्यमातून धर्मग्रंथातील ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सेतू अनुभवता येणार आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच संशोधनाची प्रेरणा मिळणार असून, प्रेक्षकांसाठीही ही प्रदर्शनी ज्ञानवर्धक ठरणार आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ.करीम सालार व प्राचार्य काजी जमिरुद्दीन यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम