
इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा
इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा
जळगाव : इकरा एज्युकेशन सोसायटी संचालित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी हिंदी दिवस कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात तिलावतने झाली. सूत्रसंचालन बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी मुस्कान नईम हिने केले. या प्रसंगी अर्शीन गोहर हिने हिंदी दिवसाचे महत्त्व मांडले, तर फरोग जमाल हिने कविता सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांनी हिंदी भाषेची संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी विद्यार्थी विविध मार्गांनी योगदान देऊ शकतात, यावर भर देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या वेळी प्रा. अजीम सर, प्रा. वसीम सर, प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे, प्रा. कविता भास्कर मॅडम, निलोफर मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी अलीना हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम