इकरा एचजे थीम महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबीर

मतदान जनजागृती मोहीम, स्वच्छता अभियान, साक्षरता मोहीम, पर्यावरण रॅली

बातमी शेअर करा...

इकरा एचजे थीम महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबीर

मतदान जनजागृती मोहीम, स्वच्छता अभियान, साक्षरता मोहीम, पर्यावरण रॅली

जळगाव I प्रतिनिधी
इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरूण येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ९ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक १ नशिराबाद येथे करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मतदान जनजागृती मोहीम, स्वच्छता अभियान, साक्षरता मोहीम, पर्यावरण इ.विषयासंबंधी रॅली काढण्यात आली.

रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरील विषयावर घोषवाक्ये तयार केले. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी संबंधीत विषयावर घोषना दिल्या. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.तनवीर खान डॉ.सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज आणि डॉ. अंजली कुलकर्णी, बाबा पटेल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हे उपस्थित होते. रॅलीची सुरुवात जि.प. उर्दु कन्या शाळा नं.१ पासून केंद्र प्रमुख शेख मसुद यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. नशिराबाद गावातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि मोहल्ल्यातून परत जि.प. उर्दु कन्या शाळा नं.१येथे रॅली ची सांगता करण्यात आली. रॅली यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम