इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
विविध प्रकारची एन्सायक्लोपेडिया, डिक्शनरी, आत्मचरित्रे धार्मिक पुस्तके संशोधनात्मक साहित्य
इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
विविध प्रकारची एन्सायक्लोपेडिया, डिक्शनरी, आत्मचरित्रे धार्मिक पुस्तके संशोधनात्मक साहित्य
जळगाव I प्रतिनिधी
इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे प्रभारी प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 जानेवारी 2025 रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची एन्सायक्लोपेडिया, डिक्शनरी, आत्मचरित्रे धार्मिक पुस्तके संशोधनात्मक साहित्य, तसेच विविध संशोधन मासिकाचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून इकरा युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य कारी अब्दुल कुद्दूस साहेब, इकरा उर्दू डी.एल.एड कॉलेजच्या प्राचार्या प्रा. सईदा वकील मॅडम, आणि इकरा पब्लिक हायस्कूलचे प्राचार्य श्री शकील शेख सर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. इरफान शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि वाचनातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे हा आहे अध्यक्षीय भाषणात डॉ अब्दुल करीम सालार साहेब यांनी पुस्तके ही ज्ञानाचा मुख्य स्रोत असल्याचे सागितले त्यानी आजच्या डिजिटल युगातही पुस्तके किती महत्त्वाची आहेत, याचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ग्रंथपाल शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम