इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन जल्लोषात
स्वामी विवेकानद यांच्याविषयी विचार व्यक्त
इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन जल्लोषात
स्वामी विवेकानद यांच्याविषयी विचार व्यक्त
जळगाव I प्रतिनिधी
इकरा शिक्षण सोसायटी संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविदयालय मोहाडी शिवार, शिरसोली रोड, जळगाव येथे स्वामी विवेकानद जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एड. प्रथम वर्षाची विद्यार्थी शिक्षिका नुजरत पटेल हिने केले. शहा हुजेफा अब्दुल अजीज या विद्यार्थी शिक्षकाने तिलावत ने कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर बी.एड. द्वितीय वर्ष ची विद्यार्थिनी शेख शामिन आणि इतर सहयोगी समूहाद्वारे तराना इकरा या गीताची प्रस्तुती करण्यात आली या कार्यक्रमात मुस्कान परविन शेख नईम, अमीन शेख आणि अनस फारुक या विदयार्थिनी शिक्षकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रा.डॉ ईश्वर सोनगरे सर यांनी स्वामी विवेकानद यांच्याविषयी विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख सरांनी विदयार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांनी केलेल्या कर्तुत्वाची जाण राखून त्याविषयीचे गुण आपल्या अंगी कसे बाणावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ इरफान शेख सर पा वसीम शेख सर, प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे सर, प्रा. कविता भास्कर मॅडम निलोफर मॅडम व इतर सते शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशीन खान या विद्यार्थीनी शिक्षिकेने करून कार्यक्रमाची सांगता केली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम