इकरा थीम महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान

विद्यार्थिनींकरिता हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

बातमी शेअर करा...

इकरा थीम महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान

विद्यार्थिनींकरिता हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

जळगाव I प्रतिनिधी

येथील ईकरा शिक्षण संस्था द्वारा संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग तसेच क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित, आत्मनिर्भर युती अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अभियानात प्रा. नयना महाजन – “सायबर क्राईम व सोशल मीडियाच्या योग्य वापर”, डॉ. राजु गवरे- “नैसर्गिक शेती व कुक्कुटपालन व्यवसाय”, डॉ. चेतन पाटील- “महिला सशक्तिकरण बँकेचे योगदान”, डॉ. प्रियंका चौधरी- “स्त्री आरोग्य”, अनिता नांदेडकर- “महिला आणि स्त्री रोजगार”, डॉ. उमेश गोगडिया- “स्त्री आणि व्यक्तिमत्व विकास” यांचे व्याख्यान संपन्न झाले

. तसेच विद्यार्थिनींकरिता हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ चांद खान यांनी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वात झालेल्या सकारात्मक बदलाबद्दल मनोगत व्यक्त केले.

 

अभियानाच्या यशस्वी आयोजनाकरिता महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शबाना खाटीक, डॉ. कहकशा अंजुम, उपप्राचार्य डॉ. वकार शेख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. साजिद मलक व डॉ. अमीन काझी, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. फिरदोस शेख यांनी परिश्रम घेतले. तसेच अभियानाच्या आयोजनाकरिता प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम