इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता १७ पर्यंत मुदत

बातमी शेअर करा...

इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता १७ पर्यंत मुदत

जळगाव  महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांर्तत महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds ) Ranking 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणीक संस्थांमध्ये शैक्षणीक वर्ष सन 2025-26 मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबतची योजना राबविण्यात येत आहे.या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय/अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहे. त्या करीता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

परदेशी शिष्यवृती अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचा अन्य महत्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहीतीसाठी https://obcbahujankalyan.maharastra.gov.in व www.maharashtra.gov.in या वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक. 17 मे 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स समता नगर, येरवडा, पुणे-411006 येथे दोन प्रतीत सादर करण्यात यावा. असे आवाहन सहायक संचालक योगेश पी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम