
इनरव्हील ईस्टतर्फे शालेय विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी
इनरव्हील ईस्टतर्फे शालेय विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी
जळगाव । इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे धानोरा येथील मराठी शाळेत शालेय विद्यार्थीनींसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात विद्यालयातील २५० विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली. यावेळी गुड टच, बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थीनींना ज्या आरोग्याच्या समस्या आहे त्याबाबत तपासणी करून त्यांना आवश्यक त्या मेडिसिन देखील देण्यात आल्या. तसेच विद्यार्थीनींना व्हिटॅमिनच्या मोफत गोळ्यांचे वाटप देखील करण्यात आले. महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाबाबत देखील वैद्यकीय तज्ञांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत सांगण्यात आले. जिथे मुलींना त्यांच्या पहिल्या मासिक पाळी दरम्यान आणि त्यांच्या संपूर्ण मासिक पाळी दरम्यान वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. जयश्री महाजन, डॉ. साधना पाटील , डॉ. चेतना राणे, डॉ. शारदा तायडे या स्त्रीरोग तज्ञांनी मुलींची तपासणी केली. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता घोडगावकर, अध्यक्ष सिमरन पाटील, सचिव रितू शर्मा यांसह क्लबच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम