
इनरव्हील क्लब ईस्टतर्फे १ हजार वह्यांचे वाटप
इनरव्हील क्लब ईस्टतर्फे १ हजार वह्यांचे वाटप
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या या एका सोहळ्यात शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मेहरूण परिसरातील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्लबतर्फे १ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डिस्ट्रीक्ट चेअरमन रमा गर्ग, इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेझरल रश्मी शर्मा, डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता घोडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक विद्यार्थ्याला सहा वह्या याप्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात १० मुलांना वह्या देण्यात आल्या होत्या तर उर्वरित वह्यांचे वाटप शाळेत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांसह शिक्षकांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम