इनरव्हील क्लब ऑफ ईस्टतर्फे गतिमंद मुलांना डेव्हलपमेंट टॉईजचे वितरण  

बातमी शेअर करा...
इनरव्हील क्लब ऑफ ईस्टतर्फे गतिमंद मुलांना डेव्हलपमेंट टॉईजचे वितरण  
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे गतिमंद मुलांना डेव्हलपमेंट टॉईजचे वाटप करण्यात आले. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या एका कार्यक्रमात या विशेष मुलांना हे टॉईज देण्यात आले. मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा तसेच त्यांची स्मरणशक्ती वाढावी याकरिता हे विशेष टॉईज मागविण्यात आले होते. त्याचे या मुलांना मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रीक्ट चेअरमन रमा गर्ग, इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेझरल रश्मी शर्मा, डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता  घोडगावकर, अध्यक्ष सिमरन पाटील, सचिव रितू शर्मा, आयएसओ रिटा भल्ला, नेहल कोठारी यांची उपस्थिती होती.  जळगाव शहरातील उडाण फाउंडेशनमध्ये शिकणाऱ्या या गतिमंद मुलांना ८ ते १० प्रकारचे हे डेव्हलपमेंट टॉईज देण्यात आले. यावेळी कार्यक्रमात फाउंडेशनच्या संचालिका हर्षाली चौधरी यांसह मुलांची उपस्थिती होती. या मुलांनी कार्यक्रमात आपले कलाप्रकार देखील सादर केले. मुलांच्या या कलागुणांचे क्लबच्या वतीने कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम