
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी संवाद कट्टा उपक्रमात उलगडले मोबाईलच्या वापराचे फायदे आणि तोटे
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी संवाद कट्टा उपक्रमात उलगडले मोबाईलच्या वापराचे फायदे आणि तोटे
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक शाळेत गुरुवार रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद कट्टा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत “मोबाईलचे फायदे व तोटे” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून मोबाईलच्या उपयोगाचे फायदे व तोटे यावर विचारमंथन करण्याची संधी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी मोबाईलचा शैक्षणिक व माहिती मिळविण्याच्या दृष्टीने होणारा उपयोग अधोरेखित केला, तर काहींनी त्याचं अतिवापरामुळे होणारं मानसिक, सामाजिक व शारीरिक नुकसान मांडलं.विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपले विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी उदाहरणांसह आपले मुद्दे मांडत असताना बाकी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. संवाद कौशल्य, विचारांची स्पष्टता आणि तंत्रज्ञानाबाबतची सजगता या चर्चेमधून विद्यार्थ्यांमध्ये प्रकर्षाने दिसून आली.काही गटाने शेवटी एक चांगला संदेश पण दिला.काही गटाने रोल प्ले द्वारे आपले विचार मांडले.हा संवाद कट्टा समुपदेशन विभागातर्फे शाळेच्या समुपदेशिका सौ.चंचल रत्नपारखी दीदींनी घेतला.
संवाद कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारपूर्वक संवाद, सकारात्मक चर्चा.विचारांची देवाणघेवाण आणि विवेकी निर्णय घेण्याची जाणीव निर्माण झाली. शेवटी समारोप करताना मोबाईल ही जरी काळाची गरज असली तरी त्याचा योग्य आणि मर्यादित वापर व्हायला हवा.त्याचा वाईट परिणाम आपल्या पुढील आयुष्यावर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी हे त्यांना सांगण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम