इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

बातमी शेअर करा...

इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पारोळा प्रतिनिधी शहरातील शिव कॉलनी परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारास सहा वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील प्रतापसिंह राठोड यांच्या मुलगी शुभांगी दिवाळीनिमित्त आई-वडिलांकडे आली होती. तिचा दीड वर्षांचा मुलगा विश्वा सुरेश चौधरी (रा. मालेगाव, जि. नाशिक) हा घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना बाजूला ठेवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरजवळ गेला. त्याच वेळी चार्जरमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने विश्वाला जोरदार शॉक बसला. तो बेशुद्ध अवस्थेत कोसळल्याने कुटुंबीयांनी तत्काळ त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आनंदी वातावरणात सुरू असलेल्या दिवाळी सणावर शोककळा पसरली. याप्रकरणी प्रकाश राठोड यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम