इलेक्ट्रीक मोटर सायकल आता काळाची गरज – महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज

पहिले ग्राहक निलेश वायकोळे यांचा सपत्नीक सत्कार

बातमी शेअर करा...

इलेक्ट्रीक मोटर सायकल आता काळाची गरज – महामंडलेश्वर जनार्दन स्वामीमहाराज

पहिले ग्राहक निलेश वायकोळे यांचा सपत्नीक सत्कार

फैजपूर प्रतिनिधि

सिका ई मोटर्स कंपनीच्या अत्याधुनिक व ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरतील अशा दणकट, मजबूत, आकर्षक व कमी खर्चात अधिक चालणाऱ्या SYD व Stingray या इलेक्ट्रीक गाड्यांचा लोकार्पण सोहळा महामंडलेश्वर श्री. जनार्दन स्वामी महाराज व महामंडलेश्वर पवनदास महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी श्रीराम उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीरामदादा पाटील तसेच सीईओ प्रणव पाटील व आराध्य ऑटोचे वितरक प्रभाकर पाटील, संदीप पाटील उपस्‍थीत होते.

फैजपूर येथील खंडोबा देवस्‍थान हॉलमध्ये SYD व Stingray या गाड्यांच्या लोकार्पण सोहळा निमित्त सिका ई मोटर्सचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सिका ही खानदेशातील पहिली इलेक्ट्रीक गाड्या उत्पादन करणारी कंपनी असून कंपनीने निर्मित केलेल्या गाड्या मजबूत, आकर्षक रंग, टिकाऊपणा असल्याने त्यांना ग्राहकांची पहिली पसंती मिळाली आहे. कंपनीचे स्वतःचे दहा हजार स्क्वेअरफिट मध्ये अत्याधुनिक सर्व्हीस सेंटर असून ग्राहकांना सुटे भाग सहज उपलब्ध होणार आहेत.

महामंडलेश्वर श्री. जनार्दन स्वामी महाराज यांनी वाढते ध्वनी प्रदुषण, व वायु प्रदुषण यामुळे मानवी जीवनावर मोठा घातक परिणाम होत आहे. त्यासाठी आपल्या उत्पादनाचा 60टक्के हिस्सा हा त्यावर खर्च होत आहे. त्यामुळे आता आपण पाणी व प्रदुषण या ग्लोबल वार्निंग याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आता शासनदेखील सोलर व इलेक्ट्रीक गाड्यांसाठी मोठी पाऊले उचलत आहे. श्रीराम पाटील हे आपल्याच भागातील असून त्यांना मी जवळून ओळखतो त्यांनी आपल्या भागात इलेक्ट्रीक व्हेईकल कारखाना सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांना आपण आता गाडी घेवून मदत करायलाच हवी. मी देखील माझ्या तुळशीधाम ऑक्सीजन पार्क मध्ये इलेक्ट्रीक रिक्षा घेतली आहे त्यामुळे इंधनाची मोठी बचत झाली आहे.

यावेळी SYD गाडीचे पहिले ग्राहक निलेश वायकोळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास निलेश (पिंटू भाऊ) राणे, नरेंद्र नारखेडे, नितीन राणे, केतन किरंगे, प्रदीप पाटील, नकुल पाटील, मेहमूद पिंजारी, जळगाव जनता सहकारी बँक, श्रीराम फायनान्स व बजाज फायनान्स चे सहकारी तसेच आराध्य ऑटोचे संचालक प्रभाकर पाटील, संदीप पाटील, सिका ई मोटर्सचे अनंत बागुल, क्रीष्णा वाघ, अतुल भंगाळे, अक्षय पाटील, स्नेहल बारी, प्रफुल्ल पाटील उपसथित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम