
इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री दुकानाला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान
इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री दुकानाला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान
जळगाव शहरातील घटना
जळगाव, शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर ccएजन्सी या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की, काही मिनिटांतच तिने दुकानाच्या सर्व मजल्यांना विळखा घातला. या आगीत फ्रिज, कुलर, पंखे, मिक्सर, ग्राइंडरसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून, अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे.
आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट इतके प्रचंड होते की, काही वेळातच संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले.
माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाने ८ ते १० बंबांच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी सुमारे चार ते पाच तास अथक प्रयत्न केले. पहाटे ६:३० वाजता अखेर आग आटोक्यात आली. या कालावधीत स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मदतकार्यात मोलाचे योगदान दिले.या आगीत दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हानी झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम