इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

बातमी शेअर करा...

इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

जळगाव, दि. २८ ऑगस्ट,- इस्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स (Home Based Health Care Giver Workers) या पदासाठी ५००० नोंकरीची संधी उपलब्ध झालेली असून, या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये साधारणतः किमान १० उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या रोजगाराच्या संधीसाठी पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय सक्षम नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पुर्ण असणे उपलब्ध, तसेच GDA/ANM/GNM/BSC Nursing/Post BSc Nursing अशाप्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती तसेच नमुद पदासाठी अर्ज करणेसाठी वरिल संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.

तरी या संधीचा लाभ जळगाव जिल्हयातील अधिका- अधिक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७ – २९५९७९० यावर किंवा कार्यालयाचा पत्ता –  शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव.यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम