ई-बाईक टॅक्सी आणि पीएम ई-बस विरोधात रिक्षाचालकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बातमी शेअर करा...

ई-बाईक टॅक्सी आणि पीएम ई-बस विरोधात रिक्षाचालकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 

जळगाव : सरकारच्या ई-बाईक टॅक्सी सेवेला मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात आणि पीएम ई-बस सेवेच्या प्रस्तावित सुरुवातीस विरोध दर्शवित जळगावातील विविध रिक्षा संघटनांनी बुधवारी (२१ मे २०२५) आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या निर्णयांमुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत संघटनांनी या सेवा रद्द करण्याची मागणी केली. यासंदर्भात एका शिष्टमंडळाने आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी आणि शहराध्यक्ष जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन, शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेना, ऑरीयन स्कूल वाहतूक युनियन, एकता ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन, शहीद भगतसिंग रिक्षा युनियन आणि कर्तव्य दक्ष पोलिस मित्र संघटना यांच्यासह अनेक पदाधिकारी व रिक्षाचालक सहभागी झाले.आंदोलनादरम्यान, रिक्षाचालकांनी ई-बाईक टॅक्सी आणि जळगाव शहर व परिसरातील गावांसाठी प्रस्तावित पीएम ई-बस सेवेमुळे त्यांच्या रोजगारावर होणाऱ्या परिणामांवर चिंता व्यक्त केली. तसेच, ऑटो रिक्षाचे खुले परवाने देण्याची प्रक्रिया थांबवावी, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळातील त्रुटी दूर कराव्यात आणि इतर मागण्यांवरही चर्चा झाली.

आंदोलनात सुनील जाधव, सुनील वाणी, राजू मोरे, शांताराम अहिरे, अशपाक शाह, विनोद कुमावत, नारायण पाटील, सरताज साहब, इमरान शेख, हितेंद्र टेकावडे, विनोद पवार, प्रमोद नेवे, फकिरा चव्हाण, हेमंत पाटील, सीताराम कुंभार, उमेश तायडे, संदीप वाणी, उमेश चौधरी, दिलीप शिंदे, राजू जयस्वाल, पद्माकर पाटील, सुनील चौधरी, संजय सोनवणे, छोटू कुंभार, समाधान महाजन, नितिन सोनार, नितीन विसपुते, मुस्ताक खान यांच्यासह जळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.या आंदोलनामुळे रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, याबाबत पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम