
ई-स्पोर्ट्स दुकान फोडून साहित्य व इनव्हर्टर चोरी
७० हजारांचे साहित्य केले लंपास ; जळगाव शहरातील घटना
ई-स्पोर्ट्स दुकान फोडून साहित्य व इनव्हर्टर चोरी
७० हजारांचे साहित्य केले लंपास ; जळगाव शहरातील घटना
जळगाव | शहरातील प्रतापनगर परिसरात असलेल्या ‘ई-स्पोर्ट्स’ साहित्याच्या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या घटनेत सुमारे ७० हजार ८३४ रुपयांचे क्रीडा साहित्य तसेच इनव्हर्टर व बॅटरी चोरीला गेली आहे. ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी उघडकीस आली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरुण परिसरातील आमीर शेख फारुख यांचे प्रतापनगर येथे ‘ई-स्पोर्ट’ नावाचे दुकान आहे. २५ एप्रिलच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आमीर शेख घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता शेजारच्या फॅशन डिझायनर दुकानात काम करणारे टेलर असलम शेख यांनी फोन करून दुकानाचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली.
आमीर शेख तातडीने दुकानात पोहोचले असता, शटरवरील दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. तपासणीअंती आढळले की, दुकानातून बॅट, टी-शर्ट, ट्रॅक पँटसह अन्य क्रीडा साहित्य तसेच इनव्हर्टर आणि बॅटरी चोरीला गेले आहे.
या चोरीमुळे दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी अलीम शेख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम