उंदीरखेडा शिवारातून गायी, म्हशींची चोरी

बातमी शेअर करा...

उंदीरखेडा शिवारातून गायी, म्हशींची चोरी
पारोळा प्रतिनिधी
तालुक्यातील उंदीरखेडा शिवारातून २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ५२ हजार रुपये किमतीच्या ५ गाई व म्हशी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. उंदीरखेडा येथील राजेंद्र काशिनाथ निकम व पंढरीनाथ पाटील हे नेहमीप्रमाणे उंदीरखेडा शिवारात असलेल्या शेतामध्ये गुरांना चारा पाणी करून घरीआले.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गुरांकडे गेले असता त्या ठिकाणी गुरे नसल्याचे स्पष्ट झाले. या ५ गुरांमध्ये ३ जर्सी गाय, एक गोऱ्हा व एक म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. सुमारे ५२ हजार रुपये किमतीच्या हे पशुधनाची चोरी झाल्याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम