
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आदिवासी वारसा, ओळख आणि अस्तित्व” या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आदिवासी वारसा, ओळख आणि अस्तित्व” या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
जळगाव, (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे “आदिवासी वारसा, ओळख आणि अस्तित्व” या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप आज, २९ मार्च २०२५ रोजी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
समारोप सोहळ्यात मराठी साहित्यिक विनायक तुमराम आणि वहारू सोनवणे यांनी आदिवासी संस्कृती, वारसा आणि ओळख या विषयांवर आपले विचार मांडले. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे आणि कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अतुल बारेकर हेही मंचावर उपस्थित होते.
परिसंवादाच्या सकाळ सत्रात देशभरातून आलेल्या संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, पैकी ४५ विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले. आदिवासींची अस्मिता, वारसा आणि अस्तित्व या संकल्पनांवर संशोधन झाले.
या परिसंवादाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि अस्तित्वाशी संबंधित महत्त्वपूर्ण चर्चा घडून आल्या. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन आणि आयोजक मंडळाच्या प्रयत्नांचे विशेष योगदान राहिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम