
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आदिवासी संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार
करारामुळे आदिवासी अकादमीच्या विकासासाठी सहकार्य
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आदिवासी संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार
करारामुळे आदिवासी अकादमीच्या विकासासाठी सहकार्य
जळगाव, (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आदिवासी संशोधन व ज्ञानकेंद्र, नवी दिल्ली यांच्यात २९ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
आदिवासी संशोधन व ज्ञानकेंद्र, नवी दिल्ली हे आदिवासी समाजाच्या कल्याणकारी योजना आणि संशोधनावर कार्यरत असलेले एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या केंद्रासोबत झालेल्या या करारामुळे आदिवासी अकादमीच्या विकासासाठी सहकार्य मिळणार आहे.
यासोबतच, संयुक्त अभ्यासक्रमांची निर्मिती परिषदा, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन विविध उपक्रमांची अंमलबजावणी हे उपक्रम विद्यापीठ आणि संशोधन केंद्राच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणार आहेत.
या कराराच्या वेळी आदिवासी संशोधन व ज्ञानकेंद्राचे प्रतिनिधी राजीव शर्मा, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, तसेच आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम