उदळी शिवारात शेतात पाणी साचल्याने शेत पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा...

उदळी शिवारात शेतात पाणी साचल्याने शेत पिकांचे नुकसान

पंचनामे करण्यास प्रशासनाचे टाळाटाळ

सावदा प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या उधळी तालुका रावेर शेत शिवारामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेत पिकाचे नुकसान झाले आहे यामध्ये जवळपास 70 ते 80 हेक्टर शिवारात पाणी साचले असून प्रशासनाकडून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसामुळे उधळी परिसरातील शिवारात नैसर्गिक नाले शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केल्याने हे पाणी थांबले असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे गेल्या आठवडाभरापासून शेतात पाणी थांबल्याने शेतातील पिकांच्या मुळा कुजत आहे केळी मका कपाशी या पिकांच्या मुळा कुजल्याने उभे पीक जमीन दोस्त होण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. कपाशी पिकाच्या बोंड कुजत असल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे यादरम्यान नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळेच शेत शिवारात पाणी तुंबल्याने हे नैसर्गिक नाले वरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे

पिकांवर मोठा खर्च
शिवारात केळी कपाशी मका उडीद मुंग अशी खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आजकाल पिकांवर मोठा खर्च होत असतो वेळेवर मजुरी खते मनुष्यबळाचा खर्च करून शेतकरी पिके वाढत असतो परंतु नैसर्गिक आपत्ती बरोबरच मानवनिर्मिती आपत्तीने शेतकरी मेटाकोटीस आला असून त्वरित शेत शिवारातील पाणी बाहेर निघेल अशी व्यवस्था करण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

प्रशासन अनभिज्ञ
उधळीशिवाय सावदा येथील मंडळ अधिकाऱ्याच्या कक्षेत येत असतो तर तेथील महसूल सहाय्यक मात्र गावात कधी नवी ते येत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला व आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील मंडळ अधिकारी व महसूल सहाय्यक हे आजपर्यंत ही शेताकडे फिरकले नाही त्यामुळे तहसीलदार यांनी आता शेताकडे येऊन आम्हाला न्याय द्यावा असे बोलत होते.

पारंपारिक नैसर्गिक नाल्यावरती शेती केली जात आहे, त्यामुळे शेत शिवारातील पाणी निघण्यासाठी जागा नाही. प्रशासनाकडे आमच्या शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आम्ही शेतकरी म्हणून मरण यातनेत जगित आहोत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा याच तुम साचलेल्या पाण्यात आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही
गोविंदा सरोदे
शेतकरी उधळी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम