
उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड
उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड
जळगाव : अपघात झाल्याने उपचारासाठी
हॉस्पिटलमध्ये गेलेल्या सैय्यद सिराज रफिक (रा. रामेश्वर कॉलनी) त्याच्योबत असलेल्या दोन महिलांनी संध्या उज्वल सोनवणे (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) या नर्स सोबत वाद घालीत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी वंदना देविदास सोनवणे यांना देखील शिवीगाळ केली. या भांडणात हॉस्पिटलमध्ये फुटलेली काच वंदना सोनवणे यांना लागून त्या जखमी झाल्या. त्याचप्रमाणे सैय्यद सिराज सैय्यद रफिक याने हॉस्पिटलचे दरवाजे तोडून नुकसान केले. ही घटना दि. ३० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सारा हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम