उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १६ व १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौरा

बातमी शेअर करा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा

१६ व १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौरा

 

जळगाव दि. १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दौरा पुढील प्रमाणे.

 

शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.४० वाजता ते जळगाव विमानतळावर आगमन करणार असून, तेथून मोटारीने जैन हिल्स, जळगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान करतील.

 

रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ते मोटारीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिंचोली, जि. जळगाव येथे सकाळी ८.०० वाजता आगमन करून बांधकामाची पाहणी. सकाळी ८.५० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शिवकॉलनी चौक, जळगाव येथे राखीव.

 

सकाळी १०.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. जिल्हा नियोजन भवनाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन करतील आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील.

 

दुपारी १२.०० वाजता जी.एस. ग्राऊंड, जळगाव येथे “समृद्ध खान्देश निर्धार मेळावा” या कार्यक्रमास उपस्थित. दुपारी १.४५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन.  दुपारी १.५० वाजता विमानाने प्रयाण.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम