उसनवारीचे पैसे मागितल्याने तरुणाला तिघांकडून मारहाण

शहरातील पिंप्राळा परिसरातील घटना

बातमी शेअर करा...

उसनवारीचे पैसे मागितल्याने तरुणाला तिघांकडून मारहाण
शहरातील पिंप्राळा परिसरातील घटना
जळगाव प्रतिनिधी

हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने तिघांनी गोपाळ सोनू कोळी (वय ३४, रा. कोळीवाडा, पिंप्राळा) या तरुणाला बेदम मारहाण केली. तर यावेळी बंटी कोळी याने लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २४ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मढीचौकात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील कोळी वाड्यात गोपाळ सोनू कोळी हा तरुण वास्तव्यास असून तो हातमजूरी करतो. दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंप्राळा स्टॉपवरुन मढी चौकात दुचाकीने जात होते. त्याठिकाणी बंटी रमेश कोळी व त्याच्यासह इतर दोघे थांबले होते. त्यावेळी गोपाळ कोळी याने बंटी याला हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपये मागितल्याचे वाईट वाटल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोपाळ कोळी याला जमिनिवर पाडून छातीत आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

लोखंडी रॉडने मारहाण करीत केली दुखापत तिघांकडून मारहाण होत असतांना बंटी कोळी

याने त्याठिकाणी पडलेल्या लोखंडी रॉडने गोपाळच्या पाठीवर आणि पोटावर व पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून गोपाळ तेथून पळून गेला. दरम्यान, गोपाळ कोळी याला खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम