
उसनवारीच्या पैशांवरून चौघांकडून दोघा तरुणांना बेदम मारहाण; एक गंभीर जखमी
उसनवारीच्या पैशांवरून चौघांकडून दोघा तरुणांना बेदम मारहाण; एक गंभीर जखमी
जळगाव : उसनवारीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादातून चौघांनी दोघा तरुणांना मारहाण केल्याची घटना दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री काशिनाथ चौक व मेहरुण परिसरात घडली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनीतील गजानन राजाराम रायते (वय २६) याचा उसनवारीच्या पैशांवरून शुभम विजय पाटील याच्यासोबत वाद सुरू होता. दि. ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजता शुभम पाटीलने गजाननला काशिनाथ चौकात बोलावले. गजानन त्याचा मित्र शेखर तरटे याच्यासोबत तेथे पोहोचला असता, शुभमने आपले साथीदार सनी जाधव, दिनेश चौधरी व अप्प्या उर्फ आकाश मराठे यांना बोलावून घेतले.
दरम्यान, वाद सुरू असताना सनी जाधवने शेखर तरटे याला मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी दोघा तरुणांना मेहरुण परिसरात नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी शुभम पाटीलने लाकडी दांडक्याने शेखर तरटेवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर चौघांनी शिवीगाळ करीत धमक्या दिल्या.
या प्रकरणी शुभम विजय पाटील, सनी जाधव, दिनेश चौधरी व अप्प्या उर्फ आकाश मराठे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम