एकनाथ खडसेंचा दावा: महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध; गिरीश महाजनांची संतप्त प्रतिक्रिया

खडसे-महाजन वाद पुन्हा पेटला

बातमी शेअर करा...

एकनाथ खडसेंचा दावा: महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध; गिरीश महाजनांची संतप्त प्रतिक्रिया

खडसे-महाजन वाद पुन्हा पेटला

जळगाव (प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. खडसेंनी महाजनांवर गंभीर वैयक्तिक आरोप केल्यानंतर महाजनांनीही जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंना थेट इशारा दिला आहे.

खडसेंनी एका व्हिडीओद्वारे दावा केला की, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध आहेत आणि याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांनी यासंदर्भात कॉल रेकॉर्ड्सचा पुरावा असल्याचाही उल्लेख केला. खडसेंनी “गगनभेदी” या यूट्यूब चॅनलवरील पत्रकार अनिल थत्ते यांच्या क्लिपचा आधार घेत हे आरोप केले आहेत.

या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन संतप्त झाले. त्यांनी खडसेंवर पलटवार करताना म्हटलं, “मी तुमच्या घरातील एक गुपित उघड केलं, तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील.” महाजनांनी खडसेंना थेट आव्हान देत म्हटलं, “एकही पुरावा सादर करा, मी तात्काळ राजकारण सोडेन. खोटं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का?” तसेच, पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “एका भोंदू पत्रकाराच्या साहाय्याने खोटा ड्रामा रचला जातोय. माझा अंत पाहण्याची चूक करू नका. मी बोलायला लागलो, तर खडसेंना लाजिरवाणी परिस्थिती ओढवेल.”

खडसे आणि महाजन यांच्यातील हे मतभेद नवीन नाहीत, पण यावेळी वैयक्तिक स्वरूपाचे आरोप आणि त्यावरची कडवट प्रतिक्रिया यामुळे हा वाद नव्या उंचीवर पोहोचला आहे. खडसेंचे दावे, महाजनांचं प्रत्युत्तर आणि पुराव्यांची चर्चा यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, येत्या काळात याचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम