
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथे “कृत्रिम बुद्धिमत्ता” प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, वस्तीगृहांचे गृहपाल कर्मचारी सहभागी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथे “कृत्रिम बुद्धिमत्ता” प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, वस्तीगृहांचे गृहपाल कर्मचारी सहभागी
जळगाव ;– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने दिनांक 23 एप्रिल रोजी एक विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात प्रकल्प क्षेत्रातील सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, वस्तीगृहांचे गृहपाल तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणाचा मुख्य विषय “कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.)” होता. आधुनिक युगात ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण, प्रशासन व दैनंदिन कामकाजात कसा करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे उपस्थितांना ए.आय. चा कार्यक्षम वापर कसा करावा, याची माहिती मिळाली.
प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा यांनी विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना तंत्रज्ञान समजून घेण्यास आणि वापरात आणण्यास प्रोत्साहन मिळाले.
प्रकल्प अधिकारीअरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्रात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शिक्षक वर्गांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत कामकाज करण्याचा संकल्प व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम