
एक जिल्हा, एक नोंदणी” योजना जळगाव जिल्ह्यात १ मेपासून कार्यान्वित – नागरिकांना मोठा दिलासा
“एक जिल्हा, एक नोंदणी” योजना जळगाव जिल्ह्यात १ मेपासून कार्यान्वित – नागरिकांना मोठा दिलासा
जळगाव, : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “एक जिल्हा, एक नोंदणी” या योजनेची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात १ मे २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू झाली आहे. या नव्या धोरणामुळे दस्त नोंदणीसाठी विशिष्ट तालुक्याच्या कार्यालयात जाण्याची गरज संपली असून, आता जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक (वर्ग-१ व वर्ग-२) कार्यालयात सर्व नोंदणी व्यवहार करता येणार आहेत.
दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक
या योजनेअंतर्गत जमीन, घर, शेती, फ्लॅट, हक्कसोड, तडजोड आदी दस्तांचे व्यवहार नागरिक त्यांच्या सोयीच्या कार्यालयात करून आपला वेळ, खर्च आणि मेहनत वाचवू शकतील. यामुळे दस्तनोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे.
शासनाची अधिसूचना जारी, अंमलबजावणीला सुरुवात
राज्य शासनाने यासंदर्भात अधिसूचना निर्गमित केली असून, त्याची अंमलबजावणी १ मेपासून जळगाव जिल्ह्यात करण्यात आली आहे. सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. सुनील पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम