एक दिवस एक तास एक साथ” संकल्पनेवर आधारित श्रमदान उपक्रम

बातमी शेअर करा...

एक दिवस एक तास एक साथ” संकल्पनेवर आधारित श्रमदान उपक्रम

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) भारत सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागात काल २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजता “एक दिवस  एक तास  एक साथ” या संकल्पनेवर आधारित श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे, भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल, रेल्वे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक, जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, जिल्हा आयकॉन  मदन लाठी, विविध स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून रॅलीने झाली. त्यानंतर स्थानकाच्या मागील परिसरात श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात रेल्वे स्थानक, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. “एक दिवस – एक तास – एक साथ” या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाने स्वच्छ भारताच्या दिशेने एकत्रित पाऊल टाकणे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचवण्यात यश मिळाले.

देशभरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार भुसावळ विभागात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजता रेल्वेच्या विविध स्थानकांवर “एक दिवस  एक तास एक साथ” या संकल्पनेवर आधारित श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मान्यवर संजय सावकारे (वस़ोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य) , भुसावळ डीव्हिजनचे डी आर एम पुनीत अग़वाल, रेल्वे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक,  जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन लाठी, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या श्रमदान उपक्रमात रेल्वे स्थानक आणि लगतचा परिसरे,  तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. “एक दिवस – एक तास – एक साथ” या मोहिमेद्वारे समाजातील सर्व घटकांनी स्वच्छ भारताच्या दिशेने एकत्रित पाऊल टाकावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सुरवातीला रॅली निघुन भुसावळ येथील रेल्वे स्टेशन च्या मागच्या परिसरात श्रमदानात रुपांतर झाले
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम