एटीएम कार्डची अदलाबदल ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची २५ हजारांत फसवणूक

बातमी शेअर करा...

एटीएम कार्डची अदलाबदल ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची २५ हजारांत फसवणूक

जळगाव प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या एटीएम केंद्रात एटीएम कार्डची अदलाबदल करूनतब्बल २५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे. रमेश हरचंद मोरे (वय ६६, रा. चंदूआण्णा नगर) असे फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

घटनेनुसार, रमेश मोरे हे किराणा सामान घेण्यासाठी शहरात आले असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्या ठिकाणी काही व्यक्ती रांगेत उभ्या होत्या. मोरे यांनी एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे उभा असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मदतीच्या नावाखाली पीन टाकण्यास सांगितले. मोरे यांनी पीन टाकल्यानंतरही पैसे न निघाल्याने त्या व्यक्तीने एटीएम कार्ड परत दिल्याचा भास निर्माण केला आणि तेथून पसार झाला.

यानंतर मोरे घरी जात असताना ख्वॉजामिया चौकात त्यांच्या मोबाईलवर सलग तीन मेसेज आले. त्यामध्ये त्यांच्या खात्यातून २५,७०० रुपयांची रोकड तीन वेळा काढल्याची माहिती होती. यावरून कार्डची अदलाबदल करून हातचलाखीने फसवणूक झाल्याचा संशय बळावला. मोरे यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात एटीएममधील अशा फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम