एनसीसी अमरावती विभाग प्रमुख ब्रिगेडिअर सचिन गवाली आणि कर्नल अश्विन वैद्य यांची जैन हिल्स येथे सदिच्छा भेट

बातमी शेअर करा...

एनसीसी अमरावती विभाग प्रमुख ब्रिगेडिअर सचिन गवाली आणि कर्नल अश्विन वैद्य यांची जैन हिल्स येथे सदिच्छा भेट

जळगाव | प्रतिनिधी : नॅशनल कॅडेट कोर (NCC) अमरावती विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर सचिन गवाली सर आणि 18 महाराष्ट्र बटालियन जळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अश्विन वैद्य सर यांनी जैन हिल्स, जळगाव येथे सदिच्छा भेट दिली.

या दौर्‍यात त्यांनी गांधी तीर्थ, परिश्रम – कॉर्पोरेट प्रोफाइल, फ्युचर फार्मिंग, श्रद्धाधाम या परम आदरणीय पद्मश्री डॉक्टर भवरलालजी जैन यांच्या शेतकरी हितासाठी साकारलेल्या प्रेरणादायी स्थळांना भेट दिली. तसेच, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे जाऊन शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेतली.

या वेळी नूतन मराठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना संलग्न अधिकारी लेफ्टिनंट शिवराज पाटील सर, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, शौर्यवीर प्रतिष्ठानचे चिन्मय नाझरकर, आयुष कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान विविध सामाजिक उपक्रम, शेतकरी विकासासाठीचे प्रयत्न आणि युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासंदर्भात चर्चा झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम