एप्लीकेशन डाउनलोड करून एकाला सव्वासात लाखात लावला चुना
सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
एप्लीकेशन डाउनलोड करून एकाला सव्वासात लाखात लावला चुना
सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी
एका व्हाट्सअप धारक अनोळखी व्यक्तीने जळगाव शहरातील मार्केटिंग करणाऱ्या एकाशी संपर्क करून त्याला एप्लीकेशन डाउनलोड करायला लावून त्याच्याकडून वेळोवेळी सात लाख तीस हजार रुपये स्वीकारून गंडविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कासमवाडी येथील जुनी मशीद समोर राहणारे इमरान हनीफ तेली वय 38 हे मार्केटिंगचा व्यवसाय करीत असून त्यांना एसएम आर्या आनंद नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने व्हाट्सअप वरून मार्केटिंगशी संबंधित एप्लीकेशन डाउनलोड करायला लावले
. त्या अनोळखी व्यक्तीने सात लाख तीस हजार रुपये दोन डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत वेळोवेळी स्वीकारून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मोहम्मद इमरान हनीफ तेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशनला एस एम आर या आनंद नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम