
एमआयडीसीतील कंपनीतून कॉपरच्या पट्टया चोरणारे तिघे जेरबंद
एमआयडीसीतील कंपनीतून कॉपरच्या पट्टया चोरणारे तिघे जेरबंद
जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज कंपनीतून कॉपरच्या पट्टया चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे.
गुन्ह्यातील आरोपींमध्ये ओम रामेश्वर पोपटकर (२०, रा. वाघनगर), रोहीत उर्फ रोहन भिकन मराठे (२२, रा. कासमवाडी) आणि सागर धर्मेंद्र सपकाळे (१९, रा. वाघनगर) यांचा समावेश आहे.
घटनेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतून तब्बल ४० हजार रुपये किमतीच्या कॉपर पट्टया लंपास केल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, पोहेका विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर व सिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने संशयितांना शोधून काढत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून त्यांना पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम