एमआयडीसीमधील मोबाईल टॉवरमधून २० हजारांचे ‘बीबीयु’ कार्ड चोरी

बातमी शेअर करा...

जळगाव: शहराच्या एमआयडीसी भागात असलेल्या एका मोबाईल टॉवरमधून २० हजार रुपये किमतीचे ‘बीबीयु’ (बेस बँड युनिट) कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ही चोरी १५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता एमआयडीसीत असलेल्या आयडिया कंपनीच्या टॉवरवर घडल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी टॉवरमधील ‘बीबीयु’ कार्ड चोरून नेले. हे कार्ड मोबाईल टॉवरच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

या घटनेची माहिती मिळताच टॉवरची देखभाल करणाऱ्या कंपनीचे सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस हवालदार गिरीश पाटील हे या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम