एमआयडीसी परिसरात तरुणाला मारहाण

तिघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

एमआयडीसी परिसरात तरुणाला मारहाण
तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव प्रतिनिधी: जळगाव एमआयडीसीतील मेरिका कंपनीजवळ ९ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यामुळे त्या तरुणाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाला आहे.

या प्रकरणी शनिवारी, १५ मार्च रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज जयपालसिंह चौधरी (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबासह जळगावमध्ये राहतो. ९ मार्च रोजी, दुपारी अडीच वाजता एमआयडीसीतील मेरिका कंपनीजवळ काही कारणाशिवाय विक्की उर्फ गणेश गोसावी, राहूल माळी आणि शुभम महाजन (सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) या तिघांनी त्याला शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली. त्याच्या जबड्याला मार लागल्यामुळे गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम