एरंडोलमध्ये ट्रकवरील सबमर्सीबल व सोलर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा...

जळगाव: एरंडोल तालुक्यात ट्रकमधून सबमर्सीबल मोटार आणि सोलर पंपची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ एका ट्रकमधून सबमर्सीबल मोटार पंप आणि सोलर पंप चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी आकाश लालचंद मोरे (वय २३, रा. मुगपाठ, ता. एरंडोल) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले.

 

पोलिसांनी नागदुली गावाजवळील पद्मालय फाटा येथून आकाश मोरेला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत ही चोरी भरत बाबुराव बागुल (वय ३२, रा. केवडीपुरा, ता. एरंडोल), पृथ्वीराज रतीलाल पाटील (वय २०, रा. वरखेडी, ता. एरंडोल) आणि पंकज रवी बागुल यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश मोरे, भरत बागुल आणि पृथ्वीराज पाटील या तिघांनाही अटक केली आहे. या टोळीतील चौथा आरोपी पंकज रवी बागुल फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही यशस्वी कारवाई उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्यासह पोहेकॉ संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी आणि दीपक चौधरी यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम