एरंडोलमध्ये विजेच्या धक्क्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा...

एरंडोलमध्ये विजेच्या धक्क्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

 

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज सकाळी विजेच्या धक्क्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेत एक चिमुकला बचावला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, गावातील एका विजेच्या खांबात शॉर्टसर्किटमुळे वीजप्रवाह उतरला होता. याची कल्पना नसल्याने एक महिला या खांबाच्या संपर्कात आल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्यासाठी गेलेले इतर चार जणही या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि दुर्दैवाने या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक लहान मूलही असल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, नेमके कारण आणि मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या घटनेला बळी पडले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम