
एरंडोल एमआयडीसीसाठी शासनाकडे पाठपुरावा – आ. अमोल पाटील
एमआयडीसीसाठी एरंडोल शिवार व उमरदे शिवारातील जमीन प्रस्तावित
एरंडोल एमआयडीसीसाठी शासनाकडे पाठपुरावा – आ. अमोल पाटील
एमआयडीसीसाठी एरंडोल शिवार व उमरदे शिवारातील जमीन प्रस्तावित
एरंडोल प्रतिनिधी येथील औद्योगिक व बेरोजगारीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती आमदार अमोल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. एरंडोल शिवार व उमरदे शिवारातील जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शालिग्राम गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, संभाजी पाटील, कुणाल महाजन, अतुल महाजन, मयूर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळातही एमआयडीसीच्या प्रस्तावासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, तो प्रश्न प्रलंबित राहिला. आता आमदार अमोल पाटील यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेत उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआयडीसी आवश्यक असल्याचे पटवून दिले. उद्योगमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आमदार अमोल पाटील यांनी पद्मालय क्रमांक दोन व अंजनी मध्यम प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांसाठीही शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच या प्रकल्पांसाठी निधी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, एरंडोल बस आगारासाठी आठवड्याभरात १० नवीन बसेस मिळणार असून, बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
युवा नेतृत्व असल्याने बेरोजगारीच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार अमोल पाटील प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या विकासात्मक भूमिकेचे युवक आणि नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम