एरंडोल तालुक्यातील आडगावात खदाणीच्या पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा...

एरंडोल तालुक्यातील आडगावात खदाणीच्या पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

 

 

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय तरुणाच्या निधनाने गावात हळहळ

 

एरंडोल: तालुक्यातील आडगाव येथे ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास खदाणीच्या पाण्यात बुडून गोपाल भाऊसाहेब महाजन (वय १६) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोपाल हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. कासोदा पोलीस स्टेशनमध्ये सुभाष लक्ष्मण महाजन यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला.

गोपालच्या पार्थिवाचे एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अकिल मुजावर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम