एल.आर.टी. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

बातमी शेअर करा...

एल.आर.टी. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

जळगाव, (प्रतिनिधी) – श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटतर्फे आज कारगिल विजय दिन निमित्ताने नेहरू पार्क येथील हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबवून वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.

कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित एन.सी.सी. कॅडेट्सना मार्गदर्शन करताना सांगितले की, कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी पराक्रमाने लढत कारगिलची शिखरे पुन्हा भारताच्या ताब्यात आणली. त्यांचा हा त्याग आणि शौर्य साजरे करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅडेट्सनी हुतात्मा स्मारकावर पुष्पार्पण करून वीर शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबवले गेले. कॅडेट्सनी परिसर स्वच्छ करत “स्वच्छ भारत, सन्मान शहीदान” या भावनेने काम केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉर्पोरल अविनाश वाकोडे, कॅडेट ओम भारती, हर्ष देवगिरीकर, आदित्य टाले, निखिल मोरया, वैभव काळपांडे, वेदांत वैराळे, सुरज ठोसर, पियुष धांडे, आयुष कुलकर्णी, एलसीपीएल कोमल मेश्राम, श्रद्धा पांडे, पल्लवी शिरसाट, अनुश्री दाणे आदी कॅडेट्सनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, समाजसेवा आणि शिस्तीचे मोल अधोरेखित झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम