
एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी.ची वार्षिक भरती उत्साहात संपन्न
अकोला: श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल (एल.आर.टी.) वाणिज्य महाविद्यालयात १९ जुलै रोजी एन.सी.सी.ची (राष्ट्रीय छात्र सेना) वार्षिक भरती प्रक्रिया उत्साहात पार पडली. ११ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अकोला येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय शुक्ला यांच्या आदेशानुसार, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नियोजनाखाली या भरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या भरती प्रक्रियेसाठी ११ महाराष्ट्र बटालियनचे सैन्य अधिकारी सुभेदार शशी कपूर आणि हवालदार ईश्वर ठाकूर उपस्थित होते. निवडीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उंची, वजन, धावणे, पुलअप, पुशअप इत्यादी शारीरिक मापदंडांची तपासणी करण्यात आली.
या संपूर्ण भरतीचे नियोजन आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्पोरल अविनाश वाकोडे, कॅडेट पवन गिरी, ओम भारती, हर्ष देवगिरीकर, आदित्य टाले, निखिल मोरया, वैभव काळपांडे, वेदांत वैराळे, धनराज जाहीर, सुरज ठोसर, पियुष धांडे, कोमल मेश्राम, श्रद्धा पांडे, सानिका राजधर, प्रेरणा गोतमारे, पल्लवी शिरसाट, तृष्णा सिंग, अनुश्री दाणे, दिव्या बावस्कर, जानवी पारसकर तसेच अनेक माजी एन.सी.सी. कॅडेट्सचे मोलाचे सहकार्य लाभले.
एन.सी.सी.मध्ये भरती झालेल्या नवीन कॅडेट्सना बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष अभिजितजी परांजपे, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा आणि समस्त कार्यकारी सदस्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम