
एसटीत १७, ४५० चालक, सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार
एसटीत १७, ४५० चालक, सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार
मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुमारे ८ हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. या बसेससाठी मनुष्यबळाची मोठी गरज लक्षात घेऊन एसटीत १७, ४५० चालक, सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. भरतीची ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री – एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाने हजारो तरुण-तरुणींना रोजगार मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना किमान ३० हजार रुपये वेतन देण्यात येईल. याशिवाय आवश्यक प्रशिक्षणाची सोयही एसटीकडून करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीतील या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार चालक व सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे.
ई-निविदा प्रक्रिया विभागनिहाय राबवली जाणार आहे. निवडीनंतर आवश्यक मनुष्यबळ संबंधित संस्थांकडून वेळेत उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम