एसटी वर्कशॉपच्या हेड मॅकेनिकने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

बातमी शेअर करा...

एसटी वर्कशॉपच्या हेड मॅकेनिकने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

 

जळगाव : शहरातील एसटी वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या हेड मॅकेनिकने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. सुनील संतोष पवार (वय ४९) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पवार हे एसटी वर्कशॉपमध्ये हेड मॅकेनिक पदावर कार्यरत होते. ते वर्कशॉपलगत असलेल्या शासकीय क्वार्टरमध्ये पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर मुलगा उठल्यावर हा प्रकार लक्षात आला आणि त्याने तातडीने शेजाऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात हलवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम