एस.पी. वाईन शॉपमध्ये चोरी; ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा...

एस.पी. वाईन शॉपमध्ये चोरी; ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास

पाळधी (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील महामार्गावर असलेल्या एस.पी. वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी शटर उचकवून ४२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे ४२ हजार रुपयांची रोकड ज्यात नोटा व चिल्लरचा समावेश होता .

या चोरीपूर्वी चोरट्यांनी  परिसरातील भारत हार्डवेअर या दुकानातही चोरी केली होती. तेथे किरकोळ चिल्लर आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेण्यात आला होता. मात्र, किरकोळ रकमेची चोरी असल्याने त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

एस.पी. वाईन शॉपचे व्यवस्थापक भुषण जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाळधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक संदीप खंडारे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम