
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात एआय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात एआय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये संगणक कसा विचार करतो, रोबोट कसे काम करतात, तसेच मोबाईल ॲप्स कसे तयार होतात याची माहिती देण्यात आली.
शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान समजले आणि भविष्यातील करिअरमध्ये उपयोग होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) विषयाचे प्रशिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व उद्योगक्षेत्रातील लोकही उत्सुक दिसत आहेत. शहरातील *सिध्देश संगणक क्लास* आणि *इंटरनॅशनल कम्प्युटर अकॅडमी* या संस्थेतर्फे आयोजित ए.आय प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेत डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, तसेच ॲप विकास यासंबंधी माहिती देण्यात आली. तज्ञांच्या मते, आगामी काळात एआयचे ज्ञान रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांना जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील, असे मा. उमाकांत बडगुजर संयोजक यांनी सांगितले.
याप्रसंगी इंटरनॅशनल कम्प्युटर अकॅडमीचे विवेक खडसे, सिद्धेश कॉम्प्युटर अकॅडमीचे राजेंद्र चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम