ए. टी. झांबरे विद्यालयाची ‘आयसर’ पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रभेट

बातमी शेअर करा...

ए. टी. झांबरे विद्यालयाची ‘आयसर’ पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रभेट

विद्यार्थ्यांनी अनुभवला अध्यात्म, शिक्षण आणि संशोधनाचा संगम

जळगाव : येथील के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या ४५ विद्यार्थी आणि सात शिक्षकांनी नुकतीच पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रभेट घेतली. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.

या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी आयसरमधील ‘इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर’मध्ये विज्ञान आणि गणितावर आधारित विविध ‘हँड्स-ऑन ऍक्टिव्हिटीज’ केल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील ‘STEAM EDUCATION’ नुसार, विद्यार्थ्यांनी सोप्या प्रयोगांद्वारे गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना अभ्यासल्या. त्यांनी आयसरमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि विविध विभागांना भेटी देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेतली. तसेच, शास्त्रज्ञांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील मस्कावद या छोट्या गावातील आणि आता नॅनो पार्टिकलवर संशोधन करणाऱ्या संशोधक हेमांगी चौधरी यांनी आपला अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. तसेच, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य श्री. संजीव सन्याल यांच्या ‘Process Reforms’ या विषयावरील व्याख्यानाचा लाभही विद्यार्थ्यांना मिळाला.

या शैक्षणिक भेटीत विद्यार्थ्यांसोहित शिक्षकांनी अष्टविनायक मंदिरांपैकी रांजणगाव येथील महागणपती आणि थेऊर येथील चिंतामणी या देवस्थानांनाही भेट दिली. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी अध्यात्म, शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा सुंदर मिलाफ अनुभवला.

या क्षेत्रभेटीसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी प्रेरणा दिली होती, तर उपक्रमशील शिक्षक महेंद्र नेमाडे आणि डी. ए. पाटील यांनी याचे नियोजन केले. या वेळी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, महेंद्र नेमाडे, पुनम कोल्हे, रोहिणी पाटील, धीरज चौधरी, नूतन वराडे आणि दिपाली खडके हे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम