ऐतिहासिक ठेवा – शहराची विशेष ओळख म्हणून मिळालेला अनमोल पुरातन अन ऐतिहासिक ठेवा…म्हणजे गोल मंदिर
बातमीदार | रविवार दि २१ जानेवारी २०२४
शहराची विशेष ओळख म्हणून मिळालेला अनमोल पुरातन अन ऐतिहासिक ठेवा…म्हणजे गोल मंदिर
शहरातील मेनरोडावर असलेल्या गोल मंदिराचा लवकरच काया पालट होणार आहे ही संपूर्ण चोपडावासीयांसाठी आनंदाची आणि गौरवाची बातमी आहे.
चोपडा – (विलास पाटील)
शहरातील मेनरोडावर असलेल्या गोल मंदिराचा लवकरच काया पालट होणार आहे ही संपूर्ण चोपडावासीयांसाठी आनंदाची आणि गौरवाची बातमी आहे.
त्यासाठी गोल मंदिर जिर्णोद्धार समितीने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. शहरातील जनतेच्या अनेक पिढ्यांच्या अनेक आठवणी या गोल मंदिराशी जुळलेल्या आहेत.
अनेकांचे बालपण, शालेय, वैवाहीक अन व्यावसायिक जीवनाच्या सुखद आठवणी व कटू गोड अनुभव
या गोल मंदिराच्या आसपास घुटमळल्या असतील आणि आजही घुटमळत आहेत शहराचा एक महत्वपूर्ण लँडमार्क बनून राहिलेल्या या गोल मंदिराची पूर्णर्निर्मिती होणे हे प्रत्येक शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
शहरातील रथ आणि गोल मंदिर हे दोन्ही एखाद्या सुवर्ण मुद्रेचे दोन बाजू आहेत. गोल मंदिराच्या जिर्णोद्धारास समस्त शहरवासीयांचे तन मन धनाने उत्स्फूर्त प्रतिसाद अन पाठिंबा असेल यात शंकाच नाही.
गोल मंदिर नव्याने कात टाकून सुंदर व देखणे रूप घेऊन आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना सनातन हिंदू धर्माची ,अध्यात्माची भक्तीची प्रेरणा देत राहील हे जाणून मन सुखावलही
गोल मंदिर जिर्णोद्धार होणे ही खूप आनंदाची अन महत्वपूर्ण बाब असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांनी ही आनंद व्यक्त करत काही सूचना ही मांडल्या आहेत.
गोल मंदिर जिर्णोद्धार समितीस जर या सूचना योग्य वाटल्यास त्यावर अवश्य विचार करावा त्या पुढील प्रमाणे मूळ गोल मंदिर आहे. तसेच गोल आकारात असावे,परंतु त्याच्या भोवती बांधलेली नक्षीदार भिंत काढून टाकावी.
कारण एकेकाळी मोठा ट्रक ही वळण(यु टर्न) घेऊ शकत असलेल्या या भागात आता या भिंती मुळे छोट्या चारचाकी गाडीस सुद्धा वळण घेण्यास अडथळा निर्माण होत असतो.
शहरातील मुख्य रस्त्याचे शेवटचे टोक असलेला हा परिसर सध्या व्यावसायिक दृष्ट्या भकास व कमी वर्दळीचा झालेला आहे, त्याचे मुख्य कारण दिवसेंदिवस अरुंद होत चाललेले परिसरातील रस्ते, चारचाकी गाड्या, मालवाहू ट्रक्स यांना वळण घेण्यास होणारी अडचण हे एक मुख्य कारण आहे.
मंदिराच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक आणि टेलिफोनचे पोल्स गाडलेले आहेत जे मंदिराच्या बाहेरील भिंती पासून फूट-दीड फूट लांब असल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता जास्तच अडचणींचा झालाय.
नवीन मन्दिर बांधतांना ४-५ इलेक्ट्रिक पोल्स ऐवजी मंदिराच्या एकाच बाजूस एक मोठा हायमास्ट पोल वर लाईट्स व इलेक्ट्रिक तारा ओढल्यास रहदारीस अडथळा होणार नाही व एकच मोठ्या आणि मजबूत खांबावर तिन्ही बाजूने येणाऱ्या विजेच्या तारा अडकवता येतील.
मंदिराची उंची पाहिजे तेवढी वाढवता येऊन मंदिराचा परीघ मूळ सध्याच्या मंदिरापेक्षा फूट भर कमी करता आला तर भविष्यात वाहतुकीस, रहदारीस होणारा मोठा अडथळा आजच टाळता येईल.
https://fb.watch/pITpP-yqmk/?mibextid=Nif5oz
या आणि अशा अनेक सूचना परिसरातील लोकांनी मांडल्या बहुतांशी मला व्यक्तिश:ही या सूचना व्यावहारिक वाटतात. चोपडा शहरातील, गोल मंदिर परिसरातील आणि जिर्णोद्धार समितीतील सर्व सुजाण व सुज्ञ नागरिकांनी या बाबत व्यावहारिक, वास्तविक व व्यापक दृष्टिकोन ठेवून आपल्या भावी पिढ्यांचे जीवन व दळणवळण सुखकर होईल असे निर्णय घेण्यात यावे.
हे ही वाचा👇
आयकाॅन अवाॅर्ड – इंडियन एज्युकेशन आयकाॅन अवाॅर्ड ने पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल सन्मानित
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम