ऐनपुर महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त अभिवादन

बातमी शेअर करा...

ऐनपुर महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त अभिवादन

ऐनपूर ता रावेर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहीमेत डॉ. पी.आर.महाजन, डॉ एस ए पाटील, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव,व्हि एच पाटील, अंकुर पाटील,हर्षल पाटील, श्रेयस पाटील, अनिकेत पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहिली. स्वच्छता मोहीमे नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ पी आर महाजन यांनी संत गाडगेबाबा यांनी जीवनभर स्वच्छतेचा महामंत्र अंगीकारला असे सांगितले. तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा एस. पी. उमरीवाड यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा. पी. पाटील डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. एस. पी. उमरीवाड प्रा. पी.आर. महाजन प्रा. एस. ए. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम