ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

ऐनपूर (ता. रावेर) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी. बी. पाटील (माजी मुख्य कार्यक्रम अधिकारी) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व उद्दिष्टे विद्यार्थ्यांसमोर मांडत समाजाभिमुखतेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रा. डॉ. जे. पी. नेहेते (विभागीय समन्वयक, NSS) यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी NSS एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवा आणि परिसर स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके (मुख्य कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. शेवटी आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी मानले.

या आयोजनात प्रा. डॉ. रेखा पाटील (महिला कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. एच. एम. बाविस्कर, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. अंकुर पाटील, प्रा. डॉ. एस. एस. साळुंके यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम