‘ऑडिट आणि चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका’ यावर विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

‘ऑडिट आणि चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका’ यावर विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव, दि. २२ जुलै: विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज, मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी गुणवत्ता विकास विभागामार्फत ‘ऑडिट म्हणजे काय आणि चार्टर्ड अकाउंटंटची मुख्य भूमिका’ या विषयावर एक विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी जळगाव येथील सुप्रसिद्ध मे. कपाडिया अँड शहा चार्टर्ड अकाउंटंट्सचे संस्थापक, सन्माननीय श्री. कल्पेश अवधूत जोशी (सी.ए.) सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी भारत सरकार (GOI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या कार्याची, तसेच इन्कम टॅक्स रिटर्न आणि GST च्या माध्यमातून उत्पन्न व खर्चाच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.

श्री. जोशी सरांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंटची (CA) आवश्यकता, त्यांचे कामकाज, ते कशा पद्धतीने कार्य करतात आणि कंपन्यांचे आर्थिक व्यवहार कसे चालतात, याबद्दल सखोल माहिती दिली. PAN (परमनंट अकाउंट नंबर) चे महत्त्व आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागत नाही, यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, नोटा छापण्याच्या मर्यादा आणि RBI चे कार्य कसे चालते, याविषयीही त्यांनी माहिती दिली.

आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि स्वतःमधील क्षमता ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे अनमोल मार्गदर्शन श्री. जोशी सरांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन श्री. श्रीराम लोखंडे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर आणि समन्वयक श्री. सचिन गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. या मार्गदर्शन वर्गामुळे विद्यार्थ्यांना लेखापरीक्षण आणि चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्राविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी निश्चितच मदत होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम